अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Answers
Answer:
सगळ्याच लोकशाही शासनांमध्ये सत्ताविभाजन असतेच... कारण सत्ता जेवढी एके ठिकाणी केंद्रित असेल तेवढी ती अनिर्बंध होण्याची भीती जास्त... पण जिथे सत्ताविभाजन हेच सरकारच्या एकूण यंत्रणेचे मध्यवर्ती सूत्र असते तिला अध्यक्षीय पद्धत म्हटले जाते.
सरकार चालवण्याचे वेगवेगळे प्रयोग लोकशाहीमध्ये होत राहिलेले दिसतात. लोकांचा शक्य तेवढा सहभाग, निर्णय घेताना लोकप्रतिनिधींचा सहभाग आणि लोकांची अंतिम सत्ता मान्य करणे अशा मूलभूत तत्त्वांचा स्वीकार करून मग प्रत्यक्षात सरकार चालवण्याचे विभिन्न तपशील शोधून त्यांनुसार प्रयोग केले जातात. अध्यक्षीय पद्धत या नावाने ओळखला जाणारा शासनप्रकार जगात अनेक देशांमध्ये प्रचलित आहे.
(भारतात केवळ ब्रिटिशांची नक्कल करून संसदीय पद्धत स्वीकारली गेली असे मानणारे लोक अनेक वेळा अध्यक्षीय पद्धतीकडे आकर्षित होतात. त्याखेरीज इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांच्या काही अनुयायांनी अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार केला होता... त्यात बॅरिस्टर ए. आर. अंतुले, वसंत साठे हे मराठी नेतेही होते. आणि भारतात ‘राजकारण सुधारण्यासाठी’ अध्यक्षीय पद्धत हवी असा बराचसा विनाकारण युक्तिवाद शशी थरूर यांनीही अलीकडे अचानक केला आहे
Explanation: