बाड कृतिया
(3) कथालेखनः
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहाः
एक गरीब मुलगा - पैसे नाहीत - शाळेचा खर्च करणे अशक्य – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत
पैशाचे पाकीट मिळते – प्रामाणिकपणाने पोलिसस्टेशनवर नेऊन देतो - पाकिटाच्या मालकास आनंद - बक्षीस
एक कृती सोडवा.
Answers
Answer:
एक छोटं गाव, त्या गावात गरीब कुटुंब राहात होतं. मुलाचे आई-वडील काबाडकष्ट करीत असत, पण त्यांचा एकुलता एक बाळू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी-छोटी कामं करून शिकत असे. काम करून तो दमून जाई. तरीही उरलेल्या वेळात अभ्यास करून आपला नंबर खाली जाता कामा नये म्हणून सतत झटत असे.
तो आपल्या वर्गशिक्षकाच्या घरची छोटी मोटी कामंही करी. त्यामुळे शिक्षकांना त्याच्याबद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते जमेल तशी मदत करत. कधी कधी वह्या पुस्तकेही घेऊन देत.त्याची हुशारी पाहून एकदा शिक्षक त्याला म्हणाले, ‘अरे बाळू, तू एवढा अभ्यास करतोस. मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू परीक्षा दिलीस, तर नक्कीच पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल.’ पण परिस्थितीपुढे बाळू हतबल होता. त्यामुळे तो गप्पच बसला. कारण त्याला वाटत होते की, आपण परीक्षेची फी कशी भरणार?
आता फी भरण्यास एकच दिवस बाकी होता. बाळू सारखा विचार करू लागला. तशातच त्याला त्यांचे शिक्षक म्हणाले, ‘बाळू, आता फी भरायला फक्त एकच दिवस बाकी आहे.’ बाळू म्हणाला, ‘गुरूजी मी फी उद्या नक्की भरतो’. गुरूजी म्हणाले, ‘ठीक आहे, फी उद्या भर, पण जाताना हे पुस्तक घेऊन जा आणि नक्की वाचून काढ.’ बाळू घरी गेला व घाईघाईने त्यानं वाचण्यासाठी पुस्तक उघडले, तो काय? त्या पुस्तकात त्याला चक्क ५०० रूपयांची नवी कोरी करकरीत नोट दिसली. त्याला आश्चर्य वाटलं, अरे ही नोट पुस्तकात कशी काय आली? त्याच्या लक्षात आलं, नक्की ही नोट गुरूजींची असणार. ती नोट मी कशी घेणार? ते पैसे गुरूजींचे आहेत. पैसे गुरूजींना परत नेऊन दिले पाहिजेत, असा विचार करून त्यानं ताबडतोब गुरूजींच्या घराचा रस्ता धरला. रस्त्यातच त्याच्या मनात विचार चालू होते. ‘या पैशानं स्कॉलरशिपची फी भरता येईल, कपडे, पुस्तके घेता येतील. हे आपणास फार उपयोगी आहेत, पण हे पैसे आपले नाहीत.’ तो धावतच गुरूजींच्या घरी पोहोचला.
गुरूजी आरामखुर्चीत बसून वाचत होते. बाळू म्हणाला, ‘गुरूजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिलं होतं, त्या पुस्तकात ५०० रूपयांची नोट होती. ती नोट तुमची आहे, ही घ्या.’ असे म्हणून त्यानं ती नोट गुरुजींकडे सरकवली.गुरूजी म्हणाले, ‘शाब्बास बाळू! एखाद्यानं हे पैसे आपल्याजवळ ठेवले असते. तुझी परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही तू अजिबात तसा विचार केला नाहीस. ताबडतोब तू माझ्याकडे माझे पैसे घेऊन आलास, खरोखर तू प्रामाणिक प्रामाणिक मुलगा आहेस हे आज मला कळाले. शाब्बास! बाळू तुझी परीक्षा घेण्याकरीताच मी ही पाचशे रूपयांची नोट पुस्तकात ठेवली होती. तू त्या परीक्षेत पास झालास.’ असे आनंदोद्गार गुरूजींनी काढले.
गुरूजींनी ते पैसे बाळूला बक्षीस दिले. त्यानं परीक्षेची फी भरली. तो खूप मन लावून अभ्यास करू लागला. अन् शेवटी चांगल्या मार्कांनी पासही झाला. त्याला शिष्यवृत्तीही मिळाली. त्याच्या समस्या संपल्या.