India Languages, asked by krushnanagare, 1 year ago

बैल पोला मराठी माहिती

Answers

Answered by rupeshwagh85572
126
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपदअमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचासण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’[१]
या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (की पराणी?) (जिच्या टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो अशी बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन त्यांची अंघोर घालण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शृंगार -?) गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा(आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडेघालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.[२]
✌❤❤
Answered by halamadrid
32

◆◆बैल पोळा◆◆

बैल पोळा हा श्रावण अमावस्येला,महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांद्वारा साजरा केला जाणारा सण आहे. बैल शेतकऱ्यांची खूप मदत करत असतात. बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

या दिवशी बैलांना छान आंघोळ घातली जाते.नंतर त्यांना रंगवले जाते,छान सजवले जाते. त्यांना दागिने,फुलांच्या माळा घातल्या जातात. त्यांचे नंतर पूजन केले जाते. मग त्यांना जेवण दिले जाते. नंतर संपूर्ण गावामध्ये नाचत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते.

या दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम दिले जाते. त्यांना पूर्ण दिवसासाठी कोणतेही काम करू दिले जात नाही. बैल पोळाच्या दिवशी घरी पुरणपोळी, करंजी व इतर गोड पदार्थ बनवले जातात.

बैल पोळाच्या दुसऱ्या दिवसापासून,शेताची नांगरणी केली जाते व बियांची पेरणी केली जाते. ज्यांच्याकडे बैल नाही आहेत, ते लोक मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करतात.

Similar questions