History, asked by shyamsandil723, 3 months ago

(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
(१) (अ)- प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे
(ब) दर्पण
बाळशास्त्री जांभेकर
(क) दीनबंधु
कृष्णराव भालेकर
(ड) केसरी
बाळ गंगाधर टिळक
(२) (अ) मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ
(ब) वॉटर पोलो पाण्यातील खेळ
(क) स्टेटींग
साहसी खेळ
(ड) बुद्धिबळ मैदानी खेळ
(३) (अ) माथेरान
थंड हवेचे ठिकाण
(ब) ताडोबा
लेणी
(क) कोल्हापूर देवस्थान
(ड) अजिंठा
जागतिक वारसा स्थळ​

Answers

Answered by aditijadhav734
9

Answer:

1 (अ)

2(ड)

मला वाटतं हे आपणास उपयाेगी ठरेल

३(ब)

Answered by rajraaz85
2

Answer:

1.अ)

पहिल्या गटातील दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर,दीनबंधू हे कृष्णराव भालेकर व केसरी हे बाळ गंगाधर टिळक यांनी चालू केले होते.

प्रभाकर -आचार्य प्र के अत्रे यांनी चालू केले नव्हते म्हणून ही जोडी चुकीची आहे असे आपण म्हणू शकतो. कारण प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले.

2. ड) बुद्धिबळ हा खेळ घरात बसून खेळायचा असतो म्हणून त्याला आपण मैदानी खेळ असे म्हणू शकत नाही त्यामुळे बुद्धिबळ हा मैदानी खेळ आहे ही चुकीची जोडी आहे- कारण बुद्धिबळ - पटावरील खेळ आहे दोन्ही बाजूला खेळाडू बसून हा खेळ खेळतात.

3. ब) ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असे अभयारण्य आहे.त्यामुळे त्याला प्रसिद्ध लेणी म्हणणे चुकीची आहे.

Similar questions