Social Sciences, asked by prathameshk3968, 2 months ago

बापूजीसाळुखे यांचे कोणत्या भाषेवर
प्रभुत्व होते?

Answers

Answered by chiranjitjana1212
1

Answer:

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे म्हणजे एक ध्येयवादी शिक्षण प्रसारक आणि शिक्षण प्रसारातून समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहणारा एक द्रष्टा समाजचिंतक आजपर्यंत समाजात उत्तमोत्तम तत्वज्ञान सांगणारी माणसे खूप होऊन गेली परंतु समाज मनावर त्यांचा प्रभाव फार काळ टिकला नाही. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्यासारख्या एखाद्या दुर्मिळ महामानवाच्या ठिकाणी मात्र उक्ती आणि कृती याचा असा काही सुंदर संगम झाला की, त्यांच्या व्यक्तिमत्वातून क्रांती घडवण्याची शक्ती ओसंडून वाहू लागते आणि अशा अलौकिक व्यक्तीच्या कार्याची मुद्रा समाज आपल्या काळजावर कोरून ठेवायला तयार असतो. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत आपल्या कार्याने एवढे मोठे योगदान दिले आहे की, समाजमनावरची त्यांची मुद्रा चिरंतन आहे. म्हणूनच आगामी २०१८-१९ या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बापूजींच्या कार्यकर्तुत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत.

plz mark me as brainliest

Answered by sardarmanikanta
2

Answer:

देशभक्त क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला लढवय्या वीराबरोबरच संत परंपरेचाही वारसा लाभलेला आहे. हा वारसा जपत गोविंद ज्ञानोजीराव साळुंखे म्हणजेच बापूजी साळुंखे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर येथे दि.९ जून, १९१९ रोजी झाला. बापूजी साधारणपणे वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले आणि मराठी सातवीमध्ये शिकत असताना त्यांचे पितृछ्त्रही हरपले. आणि बापूजींच्या खडतर जीवन प्रवासाची सुरुवात झाली. पोरक्या बापूजीना इस्लामपूरच्या राम मंदिरात राहावे लागले. प्रभू रामचंद्राच्या त्यागाचा संस्कार घेत बापुजींनी प्रसंगी वार लावून, उपाशी पोटीराहून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या छ्त्रछायेखाली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान १९४० मध्ये त्यांचा विवाह सुशीलादेवी यांचेशी झाला. आपले गुरु डॉ.अप्पासाहेब पवार यांची आज्ञा म्हणून बापूजी सोंडूर संस्थानाचा इतिहास लिहिण्यासाठी गेले. तेथे राजगुरू म्हणूनही त्यांनी कार्य केले पण १९४२ साली देशभर उसळलेल्या क्रांतीलढ्याची हाक त्यांना स्वस्थ बसू देईना. या हाकेला ओ देत, राजवैभवाचा त्याग करीत बापुजींनी स्वातंत्र संग्रामात उडी घेतली आणि महात्मा गांधींचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवत स्वंतंत्र लढ्यात सहभाग घेतला. आचार्य विनोबाजी भावे यांच्या भूमिगत चळवळीत योगदान दिले. भारत स्वतंत्र झाला. बापुजींचे अनेक सहकारी समाजकारण, राजकारण आणि सहकार यात सक्रीय झाले. परंतु बापुजींनी आपल्या पूर्वायुषात स्वतः सहन केलेले गरीबीचे चटके आणि दैन्यावस्था लक्षात घेत आपल्या जीवनाचा मार्ग आखला. समाजातील गरीबी, दारिद्र्य, दुरावस्था त्यांना अस्वस्थ करीत होती. या साऱ्यांसाठी शिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे हे बापुजींनी ओळखून आपले जीवनाचे धेय निश्चित केले. आपण कशासाठी जगायचे आणि कशासाठी समर्पित व्हायचे हे त्यांनी ठरविले आणि या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राची शैक्षणिक भूक भागविण्याचा वसा आपल्या शिरावर घेतला.

plz mark me as brainliest

Similar questions