ब्राझीलमधील शेतीउद्योगांची माहिती लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
i) ब्राझीलमधील ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेश या भागांत शेती व्यवसायाची भरभराट झाली आहे.
ii) येथील सौम्य हवामान, मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान व तेथील भूरचना यांमुळे ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेश या भागांत विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन होते.
iii) ब्राझीलमध्ये प्रामुख्याने भात व मका या खाद्यान्न पिकांचे, कॉफी, काकाओ (कोको), रबर आणि ऊस या नगदी पिकांचे आणि केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.
iv) ब्राझील देशातून सर्वाधिक प्रमाणावर कॉफी व सोयाबीन या उत्पादनांची निर्यात होते.
Similar questions