ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.(भौगोलिक कारणे)
Answers
Answer: पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या माध्यमातून पर्यटन वाढविणे हा पर्यावरणस्नेही पर्यटनाचा हेतू आहे. थोडक्यात, पर्यटनाच्या या प्रकारात आनंद घेण्यासाठी, अनुभवासाठी किंवा एखाद्या क्षेत्राच्या नैसर्गिक सौंदर्याच्या अभ्यासासाठी मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या ठिकाणी जाणे याचा समावेश होतो.
ब्राझीलमधील पर्जन्यवनांमध्ये पर्यावरणीय पर्यटन वाढवून या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदाच होईल. कारण जास्तीत जास्त पर्यटक या भागास भेट दिल्यास तेथील दुकाने, स्थानिक हॉटेल आणि संबंधित इतर व्यवसायांना फायदा होईल. याव्यतिरिक्त, पर्जन्यवनांमध्ये वाहतूक आणि दळणवळणाची व्यवस्था सुधारेल.
पर्यावरणस्नेही पर्यटनामुळे, अमेझॉनच्या वनांविषयी जागतिक पातळीवर संवेदनशीलता आणि जागृती निर्माण होईल म्हणून तेथे अशा प्रकारचे पर्यटन नव्याने विकसित होत आहे.
Explanation:
उत्तर :-
१) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अॅमेझॉन नदीखोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
२) पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे.
३) पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे.
म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.