ब) टीपा लिहा. १) प्रतिरोध पाऊस २) अपपर्णन aswer
Answers
Answer:
xuxuh xuxuh j krs k dh jrjdikfkrhbbrjuitbbjdo
Answer:
1. प्रतिरोध पाऊस
उत्तर:
i.उंच पर्वतरांगांनी बाष्पयुक्त ढग अडवल्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
ii. बाष्पयुक्त वारे हे मोठ्या जलाशयावरून किंवा समुद्रावरून पर्वतरांगांकडे येतात.
iii. तथापि, त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात.
iv. म्हणून पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्वदिशेने जाऊ लागतात.
V. जशी उंची वाढते, तसे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो.
vi. यामुळे, पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त प्रमाणात पाऊस पडतो.
vii. पर्वत ओलांडल्यानंतर मात्र वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि हवेची बाष्पधारणक्षमता वाढते.
viii. परिणामी, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते, म्हणून या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.
ix. प्रतिरोध पाऊस जगातील बहुतेक भागात पडतो. भारतात पडणारा पाऊस हासुद्धा प्रतिरोध पाऊस आहे.
2.अपपर्णन
खडक फुटताना त्यांचे कणी विघटन (कणकण वेगळे होणे) होते, अपपर्णन (कांद्यासारखे पापुद्रे निघणे) होते, सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन खडकांचे मोठे ठोकळे अलग होतात किंवा त्यांचा विध्वंस होऊन त्यांचे अणकुचीदार व धारदार तुकडे तुकडे होतात. उष्णतेमुळे खडक तापतात व प्रसरण पावतात. ते निवले म्हणजे आकुंचन पावतात.