बातमी लेखन - ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण या विषयावर बातमी लेखन करा in Marathi I want
Answers
Answer:
सोसायट्यांना पालिका प्रशासनाचे पुन्हा आवाहन
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
शहरातील कचऱ्याचा भीषण बनलेला प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना दिखाव्यापुरत्याच असल्याचे अनेकदा समोर आहे. अनेक सोसायट्यांमधून ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला जात असतानाही कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घंटागाड्या हा कचरा एकत्रितच नेत असल्याची नागरिकाची तक्रार आहे. आता पुन्हा एकदा प्रशासनाकडून नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी न्यायलयाने आणि हरीत लवादाने दिलेली मुदत संपली असली तरी प्रत्यक्षात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही, प्रशासनाकडून नागरिकांच्या डोक्यावर यासाठी खापर फोडले जात असले तरी प्रशासनाकडून मात्र कचऱ्याबाबतीत आरंभशूरपणा दाखवला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. १०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सोसायटीमधील घनकचऱ्याची त्या सोसायट्यांनी विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असून शहरातील प्रत्येक नागरिकाने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी हातभार लावावा, घंटागाड्यांमध्ये ओला, सुका कचरा वेगळा द्यावा असे आवाहन मागील ४ ते ५ वर्षांपासून प्रशासनाकडून केले जात आहे. अनेक सोसायट्या सुका आणि ओला कचरा वेगळा करून देत असताना घंटागाड्या आणि कचरा वेचक हा सगळा कचरा पुन्हा एकत्र करूनच नेत असल्याचे वास्तव आहे. अनेकदा या बाबतचे व्हिडीओ चित्रीकरण करत नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी या तक्रारीनंतरही फरक पडलेला नाही. आता पुन्हा एकदा घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याणमधील काही सोसायट्यांमधील रहिवाशी संकुलांतील नागरिकाशी संवाद साधत ओला व सुका कचरा वर्गीकरण करून हा कचरा महापालिका घंटा गाडीत देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
I hope this will help you
Answer:
मतढज्ञतक्षम ड्रेसिंग आ