Geography, asked by ghotekaryogesh73, 11 months ago


बातमीलेखन
पुढील घटनेवर आधारीत बातमी तयार करा.
अविचाराने ओढवला भीषण अपघात !
सेल्फी काढताना जीव गमावला ......
मुंबईतील महिला पर्यटकाचा महाबळेश्रव ये
दरीत पडून मृत्यू

Answers

Answered by AadilAhluwalia
519

अविचाराने ओढवला भीषण अपघात!

सेल्फी काढताना जीव गमावला.....

महाबळेश्वर, १२ नोव्हेंबर २०१८- दिवाळीच्या सुट्टीत फिरायला आलेल्या मुंबईतील महिला पर्यटकाने सेल्फी काढताना जीव गमावला. मंकी पॉईंटच्या दरीत सेल्फी काढताना महिलेचा तोल गेला. मोबाईल हातातून सटकला आणि तो वाचवण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावल्याची धक्कादायक बाब घडली आहे.

दगावलेल्या महिलेचे नाव श्वेता निधे असून ती एक ३४ वर्षांची स्त्री होती. मुंबईत शिक्षिका असून दिवाळीचा सुट्टीत ती सहकुटुंब फिरायला महाबळेश्वर येथे अली होती. ह्या घटनेनं पूर्ण महाबळेश्वर हादरलेलं असून ह्या वर्षीचा हा चौथा बळी आहे. सेल्फी काढताना लोकांचं भान जागेवर नसल्यामुळे अनेक मृत्युमुखी पडतात. ह्या घटनेनंतर मंकी पॉईंट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

Answered by pranavkharche2005
25

हे उत्तर आहे तुम्हाला अजून मिळेल

Attachments:
Similar questions