baatmi lekhan earthday marathi
Answers
Answer:
sooorrryyy but i don't know about Marathi
Answer:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Apr 2019, 08:16:00 AM
जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीची नैसर्गिक भेट किती सुंदर असू शकते याची छोटीशी झलक अॅनिमेटेड डुडलमधून देत गुगलने हा दिन साजरा केला आहे.
जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीची नैसर्गिक भेट किती सुंदर असू शकते याची छोटीशी झलक अॅनिमेटेड डुडलमधून देत गुगलने हा दिन साजरा केला आहे.
या गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे.
डुडलच्या पहिल्या स्लाइटमध्ये दिसतो तो वॉन्डरिंग अल्बट्रॉस पक्षी. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पंखांचा हा पक्षी. तो उडताना शेकडो मैलांपर्यंत पंख फडफडवत नाही. दुसऱ्या स्लाइडमध्ये सर्वाधक उंच कोस्टर रेडवुड झाड दिसतं. जगातला सर्वात लहान बेडूकही आपल्याला दिसतो. सर्वात मोठी पाणवनस्पती अॅमेझॉन वॉटल लिलीदेखील आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीवर ४० कोटी वर्षांपासून अगदी डायनॉसोर काळापासून ज्याचं अस्तित्व आहे तो सीलकॅंथ पक्षीही या डुडलमध्ये आहे.
जेव्हा पृथ्वी दिन सुरू झाला तेव्हा तो २१ आणि २२ एप्रिल रोजी साजरा केला जात असे. १९७० पासून तो २२ एप्रिलला साजरा होण्यास सुरुवात झाली.
or
वसुंधरा दिन किंवा पृथ्वी दिन (Earth Day in Marathi) हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण जगातील तब्बल 192 देशात एकत्रितपणे साजरा करतात. वसुंधरा दिन म्हणजे काय, तर 22 एप्रिलला हा वसुंधरेच्या संवर्धनाचा संदेश देणारे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात. पहिला जागतिक वसुंधरा दिन 1970 साली साजरा करण्यात आला होता. या दिवसाचा मुख्य उद्देश आहे वसुंधरा म्हणजे काय, शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत लोकांना प्रेरित करणं. दरवर्षी एका थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा तुम्हीही आपल्या आप्तजनांना या दिवशी वसुंधरा म्हणजे काय, वसुंधरा दिन म्हणजे काय, पृथ्वी वाचवा घोषवाक्य असे संदेश पाठवून प्रेरणा द्या आणि आपल्या वसुंधरेबाबत सजग करा.
**✿❀ Hope this help you ❀✿**