banyan tree information marathi
Answers
Answer:
वडाचा झाड हा भारताचा राष्ट्रीय झाड आहे.हा झाड भारताच्या जवळजवळ सगळ्या भागांमध्ये आढळतो.हा झाड भरपूर प्रमाणात वातावरणात ऑक्सीजन प्रदान करतो.याची पाने खूप मोठी असतात व ती हवा शुद्ध ठेवण्यात मदत करतात.हा झाड आपल्याला भरपूर सावली देतो.झाडाच्या फांद्यांपासून निघणारे वायवी मुळं या झाडाला आधार देतात.
भारतात या झाडाचे धार्मिक महत्व असून याला पवित्र मानले जाते.भारतामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी सुवाशिनी वडाच्या झाडाची पूजा करतात.हा झाड त्रिमूर्तीचा प्रतीक असून असे म्हटला जाते की या झाडाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव, फांद्यांमध्ये शंकर देव आणि सालामाध्ये विष्णु देवाचा वास आहे.
या झाडाचे औषधी गुणधर्म देखील आहेत.झाडाचे पान,साल,बियाणे यांचा प्रयोग डायबिटीज,जुलाब,मूत्र विकार,दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो.याच्या वायवी मुळांचा उपयोग दात घासण्यासाठी केला जाऊ शकतो व त्याच्या उपयोगाने दाताच्या व हिरड्याच्या समस्या होत नाहीत.या झाडाचा पांढरा चीक कंबरदुखी,जखम,अल्सर,संधिवात यासारख्या समस्यांच्या उपचारामध्ये मदत करतो.
म्हणून या झाडाला कल्पवृक्ष म्हणजेच इच्छा पूर्ण करणारे झाड म्हटले जाते.
Explanation: