India Languages, asked by Sharmagaurav1412, 6 months ago

Batmi lekhan marathi​ of corona virus

Answers

Answered by Divya12k
2

Answer:

करोनाबाधित-9,431,691

एकूण मृत्यू-137,139

यशस्वी उपचार-8,847,600

उपचार सुरू-446,952

प्रतिबंधात्मक उपाय

हात वारंवार स्वच्छ धुवा, गर्दीची ठिकाणे टाळा

करोनाची लक्षणे

तुम्हाला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर...

अफवा वि. वास्तव

सावध राहा! करोनावर सर्वाधिक चर्चेतले दावे आणि त्याचं

Answered by Ishaan038
0

Answer:

करोना व्हायरसची वैद्यकीय चाचणी कशी केली जाते?

करोना व्हायरसचा (Covid-19)संसर्ग झाला आहे की नाही? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. करोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे थ्रोट स्वॅब (घशातील त्वचेचे नमुने) आणि नेझल स्वॅबचे (नाकातील त्वचेचे नमुने) नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही? हे ठरवलं जातं. अन्यथा, तुम्हाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी क्वारेंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे. 

करोना व्हायरस आजारातून प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो?

याबाबत अद्याप ठोस माहिती कळू शकलेले नाही. चीनमधील काही वैद्यकीय अहवालांच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींना करोना व्हायरसची लागण झालेली होती, योग्य औषधोपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आली होती. पण काही जण पुन्हा आजारी पडल्याचे आढळून आले. संबंधित व्यक्तीला त्याच आजाराची पुन्हा लागण झाली होती की नवीन संसर्ग झाला होता किंवा रुग्णांची आजारातून प्रकृती सुधारलीच नव्हती,या सर्व शक्यतांवर अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली आहे. ही बाब प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, करोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्यास किंवा करोना व्हायरसग्रस्त रुग्णाची काळजी घेत असाल तरच फेस मास्क वापरा. कारण एकच मास्क वारंवार वापरला जाऊ शकत नाही. तुम्हाला संसर्ग झालेला नाही किंवा करोनाबाधित रुग्णाची काळजीही घेत नसाल तर तुम्ही मास्क वाया घालवत आहात. सर्दी-खोकल्या त्रास होत असल्यास मास्क वापरा. वापरलेल्या मास्कची योग्य पद्धतीनं व्हिलेवाट लावली जाणंही आवश्यक आहे.

Similar questions