Benjamin Franklin Information in Marathi : Essay, Biography, Nibandh
Answers
बेंजामिन फ्रँकलिन सामूहिक राज्य अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक होते. एवढेच नव्हे तर ते अमेरिकेतील विविध विषयांच्या व्यासंगी विदवान होते. ते अमेरिकेचे फाउंडिंग फादर म्हणून ओळ्खले जातात. ते लेखक, शास्त्रज्ञ, व्यंगकार, संशोधक व राजकारणी होते. ते विजेसंबंधीत त्यांचा सिद्धांतांचा व्याख्यात होते. त्यांनी अमेरिकेत पहिले पुस्तकालाय चालू केले. पेनसल्व्हेनिया येथे त्यांनी पहिल्या अग्नी विभागाची स्थापना केली होती.पेनसल्व्हेनिया विश्वविद्यालय स्थापन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. ते एका वृत्तपत्राचे संपादकसुद्धा होते.
लेखक म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. पुअर रिचर्ड्स ऑल्मनैक आणि द वे टू वेल्थ ही दोन पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत. संगीताचा क्षेत्रातही त्यांनी त्यांचे नशीब अजमावले होते. ते विना, वोइलिन, आणि गिटार वाजवायचे.
फ्रँकलिन यांचा जन्म १७ जानेवारी १७०६ रोजी, बोस्टन येथे झाला. ते कोणत्याही राजकारणी दलाचे भाग नव्हते. १८ ऑक्टोबर १७८५ च्या मतदानात ते पेनसल्व्हेनिया चे ६वे पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. यु.एस.ए चा स्थापनेनंतर त्यांना 'पहिला अमेरिकन' म्हणून संबोधले गेले होते.