English, asked by sarya8796, 11 months ago

My Hobby Essay in Marathi | Maza Avadata Chand, My Favourite Hobby

Answers

Answered by AadilAhluwalia
2

छंद म्हणजे आपल्या फावल्या वेळात जोपासलेली आवड. छंद बनवण्यासाठी खूप गोष्टी आहेत. कोणाला चित्र काढायला आवडतात, कोणाला गाणे गायला आवडतं, कोणाला नाचायला आवडत, तर कोणाला खेळायला आवडतं. पण माझा आवडता छंद म्हणजे वाचन. मला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला खूप आवडतात. जरा कुठे वेळ मिळाला तर मी पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करतो.

वाचन काही लोकांना कंटाळवाणं वाटतं. हा निव्वळ गैरसमज असून बाकी काही नाही. वाचन फक्त अभ्यासपूर्ती नसून खूप मोठा विषय आहे. विरंगुळ्यासाठी कॉमिक्स वाचले जातात. वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तके आणि कादंबऱ्या वाचायला मला आवडतात. ह्या व्यतिरिक्त मी आर्टिकल्स, ब्लॉग, एवढेच नव्हे तर वृत्तपत्र सुद्धा वाचते. मराठीच नव्हे तर इंग्रजी व हिंदी साहित्यही माझा वाचनात असतो.

वाचनात मजा आहे. त्यातून निरनिराळ्या प्रकारच्या आनंद मिळू शकतो. पुस्तक नसेल तरी इंटरनेट वर तुम्ही विनोद व मिम्स वाचू शकता. लाखो लोकांनी मांडलेलं मत तुम्ही तुमचे मत निर्माण करण्यासाठी वाचू शकता. प्रवास करताना मी माझ्या जवळ एक तरी पुस्तक हमखास ठेवते.

वाचनामुळे आपल्याला माहिती मिळते. आपल्या ज्ञानात भर पडते, सामान्य ध्यान वाढतं. जगात कुठे काय चालू आहे ह्या सगळ्याची खबर आपल्याला वाचून मिळते. महत्वाचं म्हणजे वाचन आपला आत्मविश्वास वाढवतं. वाचनाची सवय खरंच खूप चांगली असते.

Similar questions