beti bachao vishay par nibandh marathi
Answers
Answer:
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरीही आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या आणि स्त्री पुरुष भेदभाव सारख्या लज्जास्पद गोष्टी अजूनही समाजात दिसून येतात. आपण २१व्या शतकांत पोहचुनही आजही महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. महिला ह्या समाजाच्या एक महत्वाच्या घटक आहेत परंतु आजकाल महिलांविषयक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे एकूण लोकसंख्येमध्ये महिलांची आकडेवारी खालावली आहे. खालावत जाणारे लिंग गुणोत्तर आणि समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे हे काळाची गरज बनले आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे एक सामान घटक आहेत.स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि लहान मुलीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने आणि सामाजिक संस्थांनी खूप अभियाने सुरु केली आहेत. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे अशाच एका अभियानांपैकी एक.
ह्या लेखामध्ये आम्ही “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ह्या भारत सरकारने सुरु केलेल्या अभियानाबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाबद्दल निबंध, भाषण स्पर्धांमध्ये आणि लेख लिहण्यास उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही माहिती पुनर्रचित करू शकता. चला तर मग सुरु करूया
plz mark brainlist plz I request you
Answer:
please read other answer