बगदादी याला का मारण्यात आले?
Answers
Explanation:
वॉशिंग्टन – संपूर्ण जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्या आणि त्यासाठी निष्पाप नागरिकांची कत्तल करत सुटलेला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ (आयसीस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार मारण्यात आले आहे. बगदादी एका भूयारात लपून बसला असताना अमेरिकेने त्याला हेरले आणि ठार केले.
अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी रविवारी सकाळी ‘काही तरी खूप मोठे घडले आहे’, अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यामुळे बगदादी याला ठार करण्यात आल्याच्या शक्यतेबाबत जगभरात चर्चा सुरु होती. मात्र, आता खुद्द ट्रम्प यांनीच या वृत्ताला पुष्टी दिली आहे. सिरियामध्ये अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली.
अमेरिकेने ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी आज सकाळी सीरियामध्ये मोठी मोहीम हाती घेतली होती. बगदादी हा एका भूयारात लपला होता. अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात तो मारला गेला. बगदादीसोबत लपलेली त्याची तीन मुले आणि अनेक सहकारीही मारली गेल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने सकाळी ही कारवाई केल्यानंतर ट्रम्प यांनी ‘काहीतरी मोठे घडते आहे’, असे ट्विट केले होते. त्यामुळे ते काय घोषणा करणार आहेत, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा त्यांनी बगदादी मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला.
आता जग अधिकच निर्धास्त झाले…
‘एखाद्या भेकडा सारखे त्याला ठार मारण्यात आले असून आता जग अधिकच निर्धास्त झाले आहे. गॉड ब्लेस अमेरिका. अबू बक्र अल बगदादी मारला गेला. मृत्यूपूर्वी बगदादी रडत होता. आक्रोश करत होता. त्याने भूयारातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला मारण्यात आले,’ असे ट्रम्प यांनी सांगितले.
बगदादी हा ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून तो इराक आणि सिरियामध्ये वास्तव्यास होता. बगदाद शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. सुरुवातीपासूनच तो कट्टरतावादी विचारसरणीचा होता. इतकेच नाही तर त्याने स्वतःच्या कुटुंबीयांसाठीही कठोर नियम केले होते व कुटुंबातील सदस्यांनाही त्याने शिक्षा सुनावली होती.
गेल्या पाच वर्षांपासून लपून असलेला बगदादी हा अनेकदा हल्ल्यांमध्ये ठार झाल्याचे वृत्त यापूर्वी आले आहेत. दोन वर्षांपूर्वीही रशियाच्या सैन्याने बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर हा दावा खोटा ठरला होता
Answer:
bagdady is kill the people and crimes
Explanation: