भौगोलिक कारणे लिहा: ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो .
Answers
जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून अनेक प्रकारचे द्रव, घण आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीच्या भूभागावर पृथ्वीच्या आतून फेकले जातात. हि क्रिया घडताना पृथ्वीत एक प्रकारचा उद्रेक होतो आणि पृथ्वीच्या आत असलेले ज्वालारस किंवा लाव्हारस पृथ्वीच्या अत्यंत कडक पृष्ठभागाच्या अनेक तडमधून बाहेर पडतो. जेव्हा जालामुखींचा उद्रेक होतो तेव्हा साहजिकच पृथ्वीच्या तळावर दाब आणि ताण अश्या क्रिया होतात आणि भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
★ उत्तर - ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो .कारण - ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे .अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात. भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात. तसेच भूकंप व ज्वालामुखी हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचे परिणाम आहेत म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचा उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते.
धन्यवाद..