Geography, asked by bhavikchudasam6202, 1 year ago

भौगोलिक कारणे द्या: लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

Answers

Answered by gadakhsanket
96

नमस्कार मित्रा,

★ लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे -

  • लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या.
  • लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.
  • माणसे काम करून देशाच्या प्रगतीस हातभार लावतात.
  • ज्या देशातील तरुण वर्गाची टक्केवारी जास्त असते, त्या देशात अवलंबित लोकसंख्या कमी असते.
  • या लोकांनी स्वतःला योग्य असे काम केले तर लोकसंख्येचा संसाधन म्हणून उपयोग होऊ शकतो.

धन्यवाद..

Answered by yanant270
7

Answer:

i) कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो.

ii) एखादया देशाची लोकसंख्या प्रमाणपेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो.

iii) एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीचे होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या ही एक महत्त्वाचे संसाधन आहे

Similar questions