भाजी मंडबीलला १ तास निबंध
Answers
Answer:
[मुद्दे : भाजी बाजारातून फेरफटका मारायला आवडते - रसरशीत भाज्यांचे विविध प्रकार - रंग आकारांची विविधता - समृद्धता - विपुलता - भाजी मार्केटातील चैतन्यमय वातावरण.]
मला भाजीबाजारातील फेरफटका फार आवडतो. आईबाबांनी बाजारातून काही आणायला सांगितले की, मी आनंदाने जातो.अनेकदा तर मी स्वतःच खरेदीचे काम माझ्याकडे घेतो. हे काम मला मिळाले की, मी मंडईची वाट चालू लागतो. मंडईत गेल्यावर आधी मी मंडईमध्ये एक फेरी मारतो. आज बाजारात काय काय आले आहे, हे पाहून घेतो.
ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात. त्या भाज्यांमधील विविधता माझ्या मनाला खुलवतेआधी भोपळी मिरचीचा रुबाब केवढा ! सगळ्या भाजीची ती राणीच जणू. तिच्यात आता रंगांची विविधता आली आहे. पिवळी भोपळी मिरची, तांबडी भोपळ मिरची ! या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही, तर
भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात. कोबी, फ्लॉवर यांचे गड्डे,तांबडा भोपळा , दुधी भोपळा आणि कोहळा हे आपली जवळीक साधत असतात. पडवळ आणि विविध शेगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात. वांग्याचे रंग आणि आकार यांत किती विविधता !
घोसाळी, दोडकी, गेंडी, तोंडली आपले अस्तित्व दाखवत असतात.
सर्व भाज्या पाहून मन तृप्त झाल्यावर मी भाज्यांचे भाव पाहतो आणि मग भाजी खरेदी करतो. पालेभाज्यांच्या दुकानात हिरव्या रंगाची विविधता आढळते. अलीकडे टोमॅटो,गाजर, मुळा, काकडी यांना फार मागणी असते. मिरचीचा तिखटपणा, आल्याचा झटका आणि लिंबाचा आंबटपणा यांच्या आठवणीने भूक वाढते.
या मंडईतील विक्रेत्यांच्या आरोळ्या, गडबड यांतील मला भाजी
मजा मलच्या विभागात मिळत नाही. म्हणूनच भाजीबाजारात फिरताना वेळ कधी निघून जातो, ते कळतच नाही!
Explanation: