World Languages, asked by vartharujit, 5 hours ago

(८) 'भूकंपग्रस्तांचे मनोगत' - यावर निबंध लिहा.​

Answers

Answered by varshakumari452
2

Answer:

भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली… फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली… अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली. काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, किंकाळ्या, आर्त हाका यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली… आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती. सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते. कित्येकांची डोकी फुटली होती. काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?

Explanation:

hope it helps

Similar questions