CBSE BOARD XII, asked by shraddha112, 1 day ago

भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद झाले तर write Essay in 200-250 words plz​

Answers

Answered by thomasvikrant
1

Explanation:

आजचे युग हे विज्ञान युग आहे. आजच्या युगाचे आधुनिक युगात रूपांतर करण्यात मोबाईलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे विकासाच्या या युगात सर्वकाही डिजिटल होत आहे मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती हे केवळ स्वप्नच राहिले असते.

मोबाईल मुळे पैशांचे कितीतरी व्यवहार ऑनलाइन होत आहेत. जर मोबाईल बंद झाले तर दूरवर पसरलेल्या आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी तसेच व्यवसायिकांशी संपर्क साधणे अशक्य होऊन जाईल. सध्याच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक गोष्ट स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. आपण घरात खुर्चीत आरामात बसून जगभरातली कोणतीही माहिती मोबाईल मुळे सहज मिळू शकतो मगाशी मोबाईल बंद झाले तर फारच अवघड परिस्थिती निर्माण होईल.

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,अलीबाबा यासारख्या ऑनलाइन शॉपिंग साठी प्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईट मोबाईल मुळे फारच भरभराटीला आलेल्या आहेत. मोबाईल मुळे कोणीही ऑनलाइन दुकान उघडू शकते आणि आपला माल जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सहज पोचवू शकते. संगणक देखील अत्यंत उपयोगी आहे परंतु संगणकाची जवळजवळ सगळीच कामे मोबाईल मधून करता येतात.

मोबाईल मध्ये विविध प्रकारचे ऍप्स आलेले आहेत त्यामुळे माणसाचे जीवन अगदी सोयीस्कर झालेले आहे. वर्तमानपत्रात वाचता येणाऱ्या बातम्या मोबाईलच्या साह्याने अगदी सहज वाचता येतात त्यामुळे जगभरात काय चालले आहे हे लगेच कळते. मोबाइल बंद झाले तर मात्र हे सगळे समजण्यासाठी आपल्याला पूर्णपणे वृत्तपत्रांवर आणि बातम्या या देणाऱ्या वाहिन्यांवर अवलंबून राहावे लागेल.

काही सुखदुःखाचे संदेश अचानकपणे आपल्याला ज्यावेळी आपल्या प्रियजनांना पर्यंत पोहोचवायचे असतात ,तेव्हा मोबाईल सारखे साधन दुसरे नाही.

मोबाइल बंद झाले तर मात्र एक गोष्ट चांगली होईल आपला बराच वेळ मोबाईलवर विविध ॲप्स बघण्या मध्ये गेम खेळणे मध्ये आणि इंटरनेटचा वापर करण्यामध्ये वाया जात असतो. हा वेळ नक्की वाचू शकतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होतात. दृष्टीदोष देखील निर्माण होतो. मोबाइल बंद झाले तर मात्र या आरोग्यविषयक दुष्परिणामांपासून आपण वाचू शकू.

मोबाईल हे यंत्र आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र विचारशक्ती नाही. मोबाईलचा वापर किती प्रमाणात करायचं आहे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे ठरवायला हवे. मोबाईल फोन बंद झाले तर काही तोटे होतील. त्या पद्धतीनं काही फायदे देखील होतील.

प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा मोबाईल बंद झाले तर मराठी निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच काही बदल सुचवायचे असतील तर तेही सुचवा.

या निबंधाचे खालील प्रमाणे ही नावे असू शकतात

|मोबाईल बंद झाले तर

|मोबाईल फोन बंद झाले तर

|मोबाइल बंद झाले तर मराठी निबंध

Similar questions
Math, 16 hours ago
English, 16 hours ago