भ्रष्टाचार या विषयावर निबंध लिहा
Answers
भ्रष्टाचार ही आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे. याचा वेळीच नायनाट करणे आवश्यक. आपल्या देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भ्रष्टाचार होय. खाण्याच्या तेलामध्ये मिलावट, गुराढोरांच्या चाऱ्याचा भ्रष्टाचार असे अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. प्रत्येक कामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर खरच भारतात प्रगती होऊ शकेल काय ? भ्रष्टाचार मुक्त भारत बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून लढा दिला पाहिजे व भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे. फक्त प्रण करून उपयोग नाही तर प्रामाणिकपना आपल्या दैनंदिनीत आणावा लागेल. जर कोणी लाच दिली नाही व प्रत्येक सरकारी कार्यालय आपली नैतिकता पाळून कार्य करू लागले. तर खरंच आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होईल.
■भ्रष्टाचार ■
भ्रष्टाचार आपल्या समाजाला मिळालेला एक मोठा अभिशाप आहे. आज देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला भ्रष्टाचार पाहायला मिळतो.
लोक आपले काम लवकर व सहजतेने करण्यासाठी पैशाची मदत घेतात ज्यामुळे योग्य व गरीब उमेदवारांना काम मिळत नाही. भ्रष्टाचार आपल्या देशाची प्रगती होऊ देत नाही.
भ्रष्टाचारामुळे बर्याच लोकांवर अन्याय होतो आणि बेरोजगारीची शक्यता वाढते.यामुळे देशाचा विकास होत नाही, विदेशी गुंतवणूक कमी होत आहे, देशाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.
भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे लोकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत, भ्रष्ट वर्तनामुळे योग्य व गरीब उमेदवारांना काम मिळत नाही.
म्हणूनच आपण भ्रष्टाचार रोखण्यासाठी एकत्रित आलो पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी. आपण स्वतः भ्रष्टाचार नाही केले पाहिजे आणि इतरांनाही भ्रष्टाचार नाही करू दिला पाहिजे.
एकमेकांची मदत करून आणि एकत्र येऊन आपण सगळेच भ्रष्टाचाराचा नाश नक्कीच करू शकतो.