India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

निवृत्ती या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
1

माझ्या सर्व बंधूभगींनींना माझा नमस्कार.

आज माझ्या निवृत्तीचा दिवस. इतके वर्ष मी या नोकरीत होतो. आज मी माझे पूर्ण काम करून सरकारच्या नियमाप्रमाणेच मला निवृत्ती रजा मिळत आहे. आनंद या गोष्टिचा होत आहे की, मला माझ्या सहकारी वृंदाकडून निरोप समारंभाचा कार्यक्रम होत आहे. सोबतच दुःख असे आहे की, उद्यापासून माझी रोजची दिनचर्या बदलेल. वर्षानुवर्ष मी 10 ते 5 याच ऑफिसमध्ये  नोकरीसाठी येत होतो. ही रोजची दिनचर्या आता उद्यापासून बदलेल. मी आपल्या सर्वांसोबत घालविलेला प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत घेवून जात आहे. आपल्या ऑफीसची अशीच प्रगती होत राहावी व माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा खुप प्रगती व्हावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे दोन शब्द संपवितो. ‘जयहिंद! जय महाराष्ट्र! ’


Similar questions