Social Sciences, asked by cprakas989, 11 months ago

भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.​

Answers

Answered by varadad25
37

उत्तर :-

१) हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.

२) पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

३) हिंदी महासागराच्या तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैर्ऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात.

४) नैर्ऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो.

५) हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो.

६) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात.

७) नैर्ऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात.

८) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.

Similar questions