Environmental Sciences, asked by roshangund456, 1 month ago

भारतातील बेरोजगारीची कारणे कोणती ते सांगा​

Answers

Answered by khandarkarsaloni24
0

Answer:

Skip to content

Nitinsir

Nitinsir

Education | Never Stop Learning

Menu

भारतातील बेरोजगारी – बेरोजगार 8 प्रकार, मोजमाप-What is Unemployment?

भारतातील बेरोजगारी – बेरोजगारीची संकल्पना

महत्वाचे मुद्दे

भारतातील बेरोजगारी – बेरोजगारीची संकल्पना

भारतातील बेरोजगारी – बेरोजगारीचे प्रकार

भारतातील बेरोजगारी चे मोजमाप

भारतातील बेरोजगारी

भारतातील बेरोजगारी

भारतीय कृषी-आधारित अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी आहे का? असेल तर बेरोजगारीची संकल्पना काय आहे? बेरोजगारी चे प्रकार कोणते? भारतातील बेरोजगारी कशी मोजली जाते? अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेणारा लेख.

काम किंवा रोजगार नसलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे म्हणता येईल. मात्र यासाठी त्या व्यक्तीची काम करण्याची अपेक्षा असणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कारण जर त्या व्यक्तीची इच्छा असेल रोजगार मिळावा अशी, पण रोजगार मिळत नसेल अशा व्यक्तीला बेरोजगार म्हणतात. भारतातील बेरोजगारी

म्हणजे यासाठी या व्यक्तीला काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ती म्हणजे समाजातील प्रचलित व निश्चित वेतन दरावर काम करण्याची इच्छा त्या व्यक्तीची असावी. काम करण्यासाठी आवश्यक सामर्थ्य त्या व्यक्तीकडे असावे आणि ती व्यक्ती काम मिळवण्यासाठी उत्सुक असली पाहिजे.

भारतातील बेरोजगारी – बेरोजगारीचे प्रकार

1) खुली बेरोजगारी –

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही जर एखाद्या व्यक्तीला नियमित उत्पन्न देणारा स्त्रोत उपलब्ध नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात. उदाहरणार्थ – कुशल कामगार स्थलांतरित बेरोजगार इत्यादी.

2) हंगामी बेरोजगारी –

काही कुशल लोकांना उदाहरणार्थ स्वेटर सारख्या वूलन वस्तू वर आधारित असणाऱ्या लोकांना तसेच शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना नियमितपणे काम मिळतेच असे नाही. वूलनचा व्यवसाय हिवाळ्यात चालतो. तसेच शेतीमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतचा अवधीही आणि कापणीपासून परत पेरणी पर्यंतचा अवधी याकाळात जी बेरोजगारी दिसते. त्याला हंगामी बेरोजगारी म्हणता येईल.

3) अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी –

आवश्यक असणाऱ्या कामगार संख्येपेक्षा जास्त कामगार जर एखाद्या कामात गुंतलेले असतील तर या अतिरिक्त कामगारांना बेरोजगार म्हणता येईल. अशी बेरोजगारी म्हणजे अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी होय. उदाहरणार्थ एक एकर शेतीचे क्षेत्र जर एक व्यक्ती पिकवू शकत असेल मात्र त्या कामासाठी चार लोक जर कार्य करत असतील तर या ठिकाणी अतिरिक्त लोक जे आहेत त्यांची बेरोजगारी अदृश्य बेरोजगारी म्हणता येईल.

4) कमी प्रतीची बेरोजगारी –

ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम घेऊन समाधान मानावे लागते. त्यावेळी कमी प्रतीची बेरोजगारी असते.

6) चक्रीय बेरोजगारी –

अर्थव्यवस्थेच्या तेजी आणि मंदीच्या चक्रामुळे जी बेरोजगारी निर्माण होते. तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात.

7) घर्षणात्मक बेरोजगारी –

जेव्हा एखादा कामगार अधिक चांगल्या प्रकारच्या कामाच्या किंवा रोजगाराच्या शोधात असतो आणि त्या कालावधीत तो बेरोजगार राहतो त्याला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. येथे घर्षण जुन्या व नव्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगांमध्ये निर्माण झालेले असते.

8) संरचनात्मक बेरोजगारी –

उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी होय. यामध्ये मजुरांची मागणी कमी पण पुरवठा जास्त अशी अवस्था असते. औद्योगिक विकास दर कमी असल्यामुळे पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. सर्वसाधारणपणे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अशा बेरोजगारीचा प्रकार आढळून येतो.

भारतातील बेरोजगारी चे मोजमाप

मोजमाप करण्यासाठी तीन प्रमुख स्त्रोत आहेत.

1)दशवार्षिक जनगणनेचे अहवाल

2) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे अहवाल

3) रोजगार व प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडील नोंदणीची आकडेवारी

यापैकी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेची आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे केली जातात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते.

1) नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा –

नित्य प्रमुख दर्जा या संकल्पनेत एका वर्षांमध्ये व्यक्ती अधिक काळासाठी आर्थिक कृतीशी संबंधित असतो. त्यामध्ये 365 दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी जे व्यक्ती आर्थिक कामात गुंतलेले असतात. ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे समजले जाते.

या 365 दिवसांमध्ये एखादी दुय्यम आर्थिक कृती त्या व्यक्तींनी केली तर तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ही दुय्यम आर्थिक कृती केलेली असेल तर तो दुय्यम दर्जावरही रोजगारात असल्याचे मानले जाते. या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून नित्य प्रमुख व दुय्यम दर्जाच्या ठरवला जातो. भारतातील बेरोजगारी

2) चालू आठवडी दर्जा –

सात दिवसांच्या कालावधीमधील एका व्यक्तीच्या आर्थिक कृतींचा समावेश चालू आठवडी किंवा साप्ताहिक दर्जा यामध्ये होतो. सात दिवसांच्या कालावधीमध्ये एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारी समजले जाते.

3) चालू दैनिक दर्जा –

चालू दैनिक दर्जाच्या या पद्धतीमध्ये व्यक्ती दररोज आर्थिक कृतीमध्ये किमान चार तास काम करणे आवश्यक असते. याच्या आधारावर ती चालू दैनिक दर्जा काढला जातो.

उपरोक्त लेखातून भारतातील बेरोजगारी बेरोजगारीची संकल्पना बेरोजगारीचे प्रकार भारतातील बेरोजगारी चे मोजमाप कसे केले जाते, हे मुद्दे समजून घेतले. जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये लोकसंख्येच्या लाभांश याचा फायदा करून घेणे ही काळाची गरज आहे. यासाठी भारतातील बेरोजगारी वर मात क

Answered by swapnilkadam8698
0

Explanation:

भारतात बेरोजगारीचे दुष्परिणाम कोंत्ते

Similar questions