*
भारतातील गिर्यारोहण संस्थांबद्दल अंतशजनाच्या सहाय्याने माहिती मिळवा
व राज्य निहाय संस्थांच्या नावाचे तक्ते वनवा लिहा.
Answers
Answer:
गिर्यारोहण हा शब्द गिरी या मराठी शब्दापासून तयार झाला आहे. गिरी म्हणजे पर्वत. ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. गेल्या काही दशकांत भारतात, विशेषतः महाराष्ट्रात ट्रेकिंगने जोर धरलेला आहे. गिर्यारोहणपर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणात दहा — पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते मौंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो.