History, asked by pranavjadhav33, 1 month ago

भारतातील पर्यटनस्थळांची माहिती लिहा​

Answers

Answered by antarikshmundle01
1

Answer:

1. केरळ: दक्षिणेतील केरळही पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे अनेक सुंदर बीच, सोबतच हिरव्यागार वनराईची चादर ओढलेले डोंगर रांगा पर्यटकांचे लक्ष्य नक्की वेधून घेताता. केरळमधील चुआर बीच, कोवलम बीच, मरुदेश्वर बीच, बेकल बीच वर्कला बीच आणि शांघमुघम बीच आदी बीच प्रसिद्ध आहेत.

2. म्हैसूर: म्हैसूरलाही राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला भेट देण्यासाठी पर्यटक अतिशय आतूर असते.

3. उदयपूर: राजवाड्यांच शहर म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमधील उद्यपूरमध्ये अनेक जुने राजवाडे आहेत. उदयपूरचे नाव पूर्वी मेवाड असे होते. या शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याची ओळख पॅलेस सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरातील सिटी पॅलेस संग्राहलय आणि सिटी पॅलेस कॅम्पलेक्स ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.

4. लोहगड: सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांमुळे महाराष्ट्रा अनेक किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण राज्यात किल्ल्याची बांधणी करुन हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. यातीलच एक किल्ला म्हणजे, लोहगड. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे.

5.दार्जिलिंग: दार्जिलिंगला क्वीन ऑफ हिल्स म्हटलं जातं. पश्चिम बंगाल स्थित दर्जिलिंग हे चाहाच्या मळ्यांसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील डोंगर दऱ्यांमध्ये विस्तारलेली हिरवीगार वनराई पर्यटकांवर नेहमीच भूरळ घालते.

Similar questions