Geography, asked by cswarna500, 1 year ago

भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आह. (भौगोलिक कारणे)

Answers

Answered by Hansika4871
57

भारत देशात विभिन्न प्रकारचे भाग (उन्हाळी, हिवाळी, पावसाळी) आढळून येतात. हे भाग वेगवेगळ्या जीवित गोष्टींना आसरा देतात (उदा. झाडे, फळे, फुले तथा प्राणी, पक्षी)

दुर्मिळ प्राणी आपल्या भारतात पाहायला मिळतात आणि ज्या प्राण्याची संख्या कामी झाली आहे त्यांच्यासाठी अभयारण्य बांधण्यात येतात.

पण सध्याच्या काळात वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ह्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाढते लोकसंख्या होय, वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांची नासाडी तसेच झाडे कापणे चालू आहे जेणे करून जंगली प्राण्यांचे जगायचे हाल होतात. त्या नंतर वाघांची नखे, चामडी, खाल, दात ह्या गोष्टींसाठी वन्य प्राण्यांची शिकार खूप वाढला आहे आणि हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे.

काळया धंद्यावर बंदी आणणे तसेच प्राण्यांचे संरक्षण करणे आजच्या काळासाठी खूप गरजेचे झाले आहे.

Similar questions