Geography, asked by ashok72gaikwad, 1 year ago

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगाभारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा ​

Answers

Answered by shabanaali49283
11

पुणे : प्रतिनिधी

भूगोल म्हटला की निसर्गाचा सर्वसाधारण अभ्यास असे गृहीतक ठरलेले असते. परंतु या अभ्यासाबरोबरच दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर देशांचा भूगोल कसा आहे आणि त्याचा आपल्या देशाशी काही संबंध आहे का, याचा तुलनात्मक अभ्यास करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये भारत आणि ब्राझील या देशांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ब्राझीलच्या लोकांचे आयुर्मान भारतीयांपेक्षा 7 वर्षांनी जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे विद्यार्थ्यांना दिसून येत असल्याची माहिती भूगोल विषय समितीचे विशेष अधिकारी रवी जाधव यांनी दिली.

दहावीच्या भूगोल विषयाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाविषयी जाधव म्हणाले, दहावीचे पुस्तक तयार करताना तुलनात्मक अभ्यासाची आवश्यकता लक्षात घेतली गेली. या पाठ्यपुस्तकात किमान दोन प्रदेश असावेत, तसेच देशामधील प्रादेशिक तुलना टाळावी असे ठरले होते. तुलना करण्यासाठी देशांचा विचार करता, एक देश भारत असणार हे निश्‍चित होते. परंतु दुसरा देश कोणता घ्यायचा याचा विचार करण्यासाठी देश अतिविकसित किंवा अविकसित नसावा, वेगळ्या गोलार्धातील असावा, तो एकाच खंडातील असावा, भारताशी बरेचसे साम्य असलेला, परंतु भारतापेक्षा वेगळ्या धाटणीचा असावा, भारताप्रमाणे सांस्कृतिक व प्राकृतिक विविधतेने नटलेला असावा, किमान एका जागतिक दबाव गटाचा भारतासह सदस्य असावा, अशा अनेक गोष्टींचे साधर्म्य पाहण्याचे ठरले आणि त्यानुसार या चौकटीत बसणार्‍या ब्राझील या देशाची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार तिसरी ते नववीच्या संकल्पनांवर आधारित दहावीचे भूगोलाचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या दोन देशांमधील प्राकृतिक रचना, हवामान, वनसंपदा, लोकसंख्या, भूमीपयोजन, उद्योग, व्यवसाय, खनिज संपत्ती, भौगोलिक रचना, वेशभूषा, आहार, परंपरा यातील साम्य विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे.

ब्राझील आणि भारताची तुलना केली असता काही गोष्टींमध्ये साम्य आढळले तरी अनेक गोष्टींत ब्राझील हा देश भारतापेक्षा वेगळा आहे. ब्राझीलमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त राहिलेले आहे. तर भारतात मात्र हे प्रमाण नेहमीच कमी राहिले आहे. भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील लोकांच्या आयुर्मानाचा विचार करता, भारतापेक्षा ब्राझीलमधील लोकांचे आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येते. भारतातील सरासरी आयुर्मान 68 वर्षे आहे, तर ब्राझीलमधील 75 वर्षे असल्याचे तुलनात्मक अभ्यास सांगतो. भारतातील अर्थव्यवस्था आणि ब्राझीलमधील अर्थव्यवस्था आणि करप्रणाली यांची तुलना केल्यास, जीएसटी करप्रणाली भारतात 2017 साली सुरू करण्यात आली. मात्र ही करप्रणाली ब्राझीलमध्ये 1984 सालीच स्वीकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही देशांतील आवर्षण प्रदेश, हिमवर्षाव, पाऊस, जंगलतोड, पाणीपुरवठ्याची साधने, अवर्षण चतुष्कोन प्रदेश आदी घटकांची तुलना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी भूगोलाचा वेगळ्या दृष्टीने अभ्यास करावा यासाठी सांगा पाहू , माहीत आहे का तुम्हाला, करून पाहा, नकाशाशी मैत्री, जरा विचार करा, पाहा बरे जमते का, शोधा पाहू, जरा डोके चालवा, थोडे आठवूया अशा कृतिशीलतेला चालना देणार्‍या घटकांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भौगोलिक दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार असल्याचेदेखील जाधव यांनी सांगितले.

Answered by gauravghadage840
0

Answer:

bhart and brazil countirey 8 page

Similar questions