History, asked by diyaraina8042, 1 year ago

भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे? (२५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा)

Answers

Answered by giripriyaanvi
11

भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्रा ला मिळालेला आहे.

म्हणून " भारतीय चित्रपटसृष्टीची जननी " अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.

Answered by shambhunathdhavan
0

Answer:

Explanation:

1. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे.

  1. उत्तर :

i) भारतात चलत्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला.

ii) १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला.

iii) दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला.

iv) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला.

अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची  ख्याती आहे

Similar questions