भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्त्र काळापर्यंत मागे जाऊ शकतो हे सिद्ध झाले
Answers
आपल्या संस्कृतीवर अनेक परकीय आक्रमणे झाली, परंतु ती नष्ट झाली नाही. भारतीय संस्कृती उपासना, त्याग, संयम, सहिष्णुता इत्यादींचे मिश्ाण असून ती आपणाला अंधारातून प्रकाशाकडे नेते. जगात जे जे मंगल आणि पवित्र आहे त्याचे आपल्याला दर्शन घडविते. साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीचे यथार्थ वर्णन केले आहे. ते म्हणतात. ''भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता, भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग.
भारतीय संस्कृती म्हणजे सारखे ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे. जगात जे जे काही सुंदर, शिव व सत्य दिसले ते ते घेऊन वाढणारी ही संस्कृती आहे. जगातील सारे ऋषिमहषीर् ती पूजील. जगातील सर्व संतांना ती वंदील. जगातील सर्व धर्मसंस्थापकांना ती आदरील. मोठेपण कोठेही दिसो, भारतीय संस्कृती त्याची पूजा करील. आदराने त्याचा संग्रह करील. भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सर्वांना जवळ घेणारी आहे. ''सवेर्षामविरोधेन ब्रह्माकर्म समारंभे।'' असे म्हणणारी ती आहे. संकुचितपणाचे वावडे असणारी ही संस्कृती आहे.'