History, asked by Omkarkudnar, 3 days ago

भारतभू ही वीरांची भूमी आहे याबाबत तुमचे मत लिहा,​

Answers

Answered by miyanight
9

प्रश्न (आ)

‘भारतभू ही वीरांची भूमी आहे,’ याबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर:

भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी । दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे

Similar questions