भाऊबहीण, पालापाचोळा
समासचे नाव ओळखा
Answers
भाऊबहीण= द्वंद्व समास
पालापाचोळासम= समाहार द्वंद्व
Answer:
बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे. पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात. 1. अव्ययीभाव समास 2. रुष समास 3. समास 4. बहु समास 1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात. अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत. ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती. वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे. क) अरबी व फारसी भाषेतील शब्द उदा. दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल. गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत. 2 ) तत्पुरुष समास : ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. महामानव – महान असलेला मानव राजपुत्र – राजाचा पुत्र तोंडपाठ – तोंडाने पाठ गायरान – गाईसाठी रान वनभोजन – वनातील भोजन वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात. 1. विभक्ती तत्पुरुष ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.