Bhajiwala and grahak yacchatil sawadn lekhan Marathi nibhand
Answers
Answer:एका भाजीमंडईमध्ये भाजीवाला आणि ग्राहक यांच्यामध्ये झालेला संवाद पुढीलप्रमाणे-
भाजीवाला: भाजी घ्या भाजी... हिरवी हिरवी ताजी भाजी... मेथी घ्या, शेपू घ्या, कोबी, गवार घ्या...
ग्राहक: मेथी कशी दिली हो दादा?
भाजीवाला: ३0 रूपये जुडी. घ्या. चांगली ताजी, हिरवीगार भाजी आहे. घरची आहे.
ग्राहक: बरं. कोबी कसा दिला?
भाजीवाला: २५ रूपये पाव किलो.
ग्राहक: अरे बापरे. किती महाग आहे हो.
भाजीवाला: अहो काय करणार आम्ही तरी. नीट पाऊस झाला तरच आमचा व्यवसाय नीट चालतो. आणि भाजी तर पाहा कसली ताजी आहे ते. एकदम माफक किंमत लावली आहे. एकतर शेतात जीव तोडून राबावं लागतं. त्यावर घर चालतं आमचं.
ग्राहक: हो. बरोबर आहे तुमचं. शेवटी तुम्हाला सुद्धा पोट आहेच की. तुम्ही शेतकरी घाम गाळताय म्हणून आम्हाला अन्नधान्य मिळत आहे. मला एक मेथीची जुडी, पाव किलो कोबी आणि गवार द्या.
भाजीवाला: (कोबी, गवार यांच वजन करतो) हे घ्या.
ग्राहक: किती रूपयांची झाली भाजी?
भाजीवाला: सगळे मिळून ९० रूपये झाले.
ग्राहक: हे घ्या पैसे.
भाजीवाला: धन्यवाद!
Explanation: