(४) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Answers
(४) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :- रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडविण्याचे कार्य आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात अश्या मुलांना रेखाजी प्रेमाने समजावून सांगतात,कायद्याची भीती घालतात,पुढील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात. आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या प्रयत्नामुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. समाज रेखाजींच्या या कार्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहील.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वीरांगना"" या पाठातील आहे.
★ रेखा मिश्रा यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रशंसनीय प्रयत्न.
राष्ट्राला एक संतुलित वळणावर आणण्याचे कार्य रेखाजींनी केले. हल्ली समाजमाध्यमांचा प्रभाव जास्त वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम ही आढळून येतात. त्या माध्यमांच्याद्वारे फसवलेल्या मुलामुलींना समजावून सांगणे कठिण असते. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, भविष्यकाळाची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करतात. ही मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतात. अशा पद्धतीने देशाचे भवितव्य घडवण्याचे कार्य रेखाजी करतात.
धन्यवाद...
"
Explanation: