CBSE BOARD X, asked by anjaliurav308, 6 months ago

bharat desh mahan in matathi essay​

Answers

Answered by amishabhuptani2019
0

Answer:

नमस्कार मित्रांनो आज आपण माझा भारत महान मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात.

खालील प्रमाणेविषय किंवा शीषर्क असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला आहे.

माझा आवडता देश भारत निबंध मराठी

भारत माझा जगी महान मराठी निबंध

भारत देश निबंध मराठीत

भारत माझा देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे. भारताचा इतिहास मोठा रोमांचक व स्फूर्तिदायक आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही भारतीयांची सर्वात मोठी ठेव आहे. हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा तिला लाभली आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या सार्‍या भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध आहेत, हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे, तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. विश्वविजयी तिरंगा असा आमचा राष्ट्रध्वज आहे. जनगणमन हे आमचे राष्ट्रगीत आहे. साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोकचक्र ही आमची अस्मिता आहे. अभिनंदन धर्माचे पंथाचे जातीचे कोट्यावधी लोक या देशात गुण्यागोविंदाने राहतात. विविध प्रांत धर्म जाती यांचा रीतिरिवाज आणि सांस्कृतिक अविष्कार आतही भिन्नता आहे. पण या विविधतेतही एकता आहे; कारण आम्ही सर्वजण भारतीय आहोत भारताचा भूगोल हा विविध अपूर्ण आहे. मोसमी वाऱ्यांची वरदान, हिमालयाची मायेची पाखर आणि गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी यासारख्या अनेक नद्यांची माया ममता यावर माझी मातृभूमी पोहोचलेली आहे. भारतावर निसर्गाचा तर वरदहस्त आहे. नैसर्गिक सुंदर याची एवढी विविधता जगात कुठेही आढळत नाही.

माझ्या भारत भूमीने अनेक नर रत्नांना जन्म दिला आहे. सम्राट अशोकाचे शांतीपर्व गौतम बुद्धाचा त्याग, महावीराची अजोड संन्यस्त वृत्ती, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा ही सर्व आमची स्फूर्तिस्थाने आहेत. दया, समा, शांती शिकवणाऱ्या संताचा आम्हाला भारताला लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग क्रांतिवीरांची तेजस्वी परंपरा आम्हाला लाभली आहे. महात्मा फुले डॉ आंबेडकर यासारखे दलितांचे कैवारी; लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस यासारखे नेते, महात्मा गांधी ,जवाहरलाल नेहरू यासारखे आधुनिक भारताचे शिल्पकार; गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर, सरोजनी नायडू, यासारखे प्रतिभावंत; स्वामी विवेकानंद, गाडगे महाराज यासारखे विचारवंत या सर्व महान विभूतींनी गौरवास्पद ठरलेला माझा भारत महानता आहे!

Similar questions