English, asked by Kehkasha7905, 1 year ago

Bhrashtachar Essay in Marathi | Bhrashtachar Ek Samasya, Corruption

Answers

Answered by fistshelter
5

Answer: भ्रष्टाचार हे एका विषासारखे आहे देशाच्या आणि समाजातील वाईट हेतूच्या लोकांच्या मनात पसरले आहे. यामध्ये सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर केवळ क्षुल्लक इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि केवळ अल्पकालीन फायद्यासाठी केला जातो.

सरकारी किंवा गैरसरकारी संस्थांमधील व्यक्ती स्वत: च्या शक्तीचा आणि पदाचा बेजबाबदार आणि चुकीचा वापर करून भ्रष्टाचार करतात. त्याचा परिणाम व्यक्ती तसेच देशाच्या विकासावर होतो. हे समाजातील असमानतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. तसेच यामुळे राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देशाच्या प्रगती आणि विकासास अडथळा निर्माण होतो.

भ्रष्टाचाराची मुळे समाजात खोलवर रूजत आहेत आणि सतत पसरत आहेत. हा कर्करोगासारखा रोग आहे जो उपचार केल्याशिवाय संपणार नाही. याचा एक सामान्य प्रकार पैसा आणि भेटवस्तू देऊन काम करून घेणे असा आहे. काही लोक त्यांच्या फायद्यासाठी इतरांच्या पैशाचा दुरुपयोग करतात.

आजच्या काळात भ्रष्टाचार ही एक गंभीर समस्या बनली आहे, जर आपण वेळीच हे रोखण्याचा प्रयत्न केला नाही तर तो देशाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पोखरून टाकेल. म्हणूनच देशाच्या चांगल्या आणि स्वच्छ विकासासाठी भ्रष्टाचार रोखणे अत्यंत आवश्यक आहे.

Explanation:

Answered by yashbabad1
1

Answer:

आपण सतत भ्रष्टाचार हा शब्द ऐकत आलेलो आहोत. आपल्या देशात आणि राज्यात हा भ्रष्टाचार कसा काय निर्माण झाला असेल? ही समस्या सामाजिक व्यवस्थेचे स्वरूप आहे की व्यक्तिगत कारणे देखील यासाठी जबाबदार आहेत याचा सविस्तर विचार केला गेला पाहिजे. समाजमन आणि व्यक्ती कसा काय भ्रष्टाचारापासून दूर राहू शकतो याचेदेखील सखोल चिंतन करावयाची गरज निर्माण झालेली आहे.

भ्रष्टाचार आपल्याला सतत न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे यामधून कळून येत असतो. त्याची झळ सरळ व्यक्तिगत स्तरावर पोहचत नसल्याने भ्रष्टाचार ही समस्या आपल्याला मोठी वाटत नाही. परंतु कधीकधी स्वतःला एका व्यवस्थेत किंवा संस्थेत लाच द्यायला लागल्यावर हा भ्रष्टाचार किती भयंकर आणि मोठा असू शकतो याची जाणीव मात्र होते. ज्या सरकारी आणि सामाजिक व्यवस्था आज निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार सहज आढळून येतो.

जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या सहज उपलब्ध आहेत परंतु मानवी स्वार्थ खूपच टोकाला पोहचला आहे. जगण्याची व्यर्थ स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेला हव्यास हा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास कारणीभूत आहे. भ्रष्टाचार हा नैतिक असो की आर्थिक, त्याला सामोरे सर्वांनाच जावे लागते. भ्रष्टाचार करणाऱ्यांची नैतिकता हीच भ्रष्ट झाली असल्याने वरवरचे लाचलुचपत कायदे आणि एखाद्या व्यक्तीला शिक्षा करून भ्रष्टाचार कमी होणारा नसतो.

आज एक व्यक्ती किती ठिकाणी सामाजिक व्यवस्थेत बांधला गेला आहे, ते प्रथम पाहुयात. माणसाची खाण्याची आणि राहण्याची गरज ही प्राथमिक आहे. त्यासाठी तो काम करतो आणि पैसे कमावतो. त्या पैशातून त्याला वरवरची मिळणारी स्वतंत्रता ही कायम स्वरूपाची वाटते आणि पैसा हेच जीवन आहे असे वाटू लागते. मग तो पैसा, संपत्ती प्राप्त करण्यासाठी मनुष्य कोणत्याही पातळीवर उतरण्यासाठी तयार असतो, त्यातूनच मग सुरू होतो भ्रष्टाचार!

Similar questions