English, asked by koshalram8365, 1 year ago

Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari

Answers

Answered by fistshelter
167

Answer:

नमस्कार मायबापहो... मी एक शेतकरी आहे, मी या पृथ्वीवर राहणाऱ्या जीवांच्या अन्नाची सोय करण्यासाठी जन्माला आलो आहे. माझे आयुष्य खूप कठीण आहे परंतु तरीही मला या जीवनात आनंद मिळतो आणि मी आनंदाने जगतो. मी इतर लोकांपेक्षा लवकर उठतो आणि शेतात जातो.

शेत हे फक्त जमिनीचा तुकडा नसून ते माझे जीवन आहे. त्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलावर मनापासून प्रेम करतो आणि त्याला चांगली मूल्ये देऊन त्याला एक चांगली व्यक्ती बनवितो, त्याच प्रकारे अत्यंत मेहनत आणि देखभाल करून मी जमीन सुपीक बनवितो.

मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करतो. वातावरण कसेही असो, मला नेहमी काम करत रहावे लागते. उन्हाळ्याच्या तीव्र तापात काम करणे सोपे नाही, परंतु तरीही मी कठोर परिश्रम करतो.

माझ्या अवघड परिस्थितीत तुम्ही माझ्याबरोबर उभे राहावे अशी माझी इच्छा आहे कारण जर तुम्ही आमच्या पाठीशी उभे नसाल तर तुम्हाला भाकरी मिळणे फार अवघड होईल.

Explanation:

Answered by devanshpatil9421
9

Answer:

your answer is here

Explanation:

आमचा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक हे गावात राहतात आणि शेती करतात. आमच्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे.

गावातील शेतकरी दिन – रात मेहनत करून शेतीची कामे करतो, पिक उगवतो आणि संपूर्ण मानवतेचे पोषण करतात. म्हणून या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो.

शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहणारा तसेच आत्महत्या करणारा होय.

शेतकऱ्याचे मनोगत

मी एक छोटा शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातील साताऱ्या गावात माझी थोडी जमीन आहे. ही जमीन माझी माय आहे. ही जमीन फारशी सुपीक नाही पण नापीकही नाही आहे.

या जमिनीवर माझे भरपूर प्रेम आहे. पण माझी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आमच्या गावाच्या जवळ पास एक मोठी नदी आहे. लहान – लहान नद्यांना पाणी हे असतच. पण तेही पावसावरच अवलंबून.

उन्हाळ्यात त्या पण नदीचे पाणी हे आटून जाते. त्यामुळे मृगाच नक्षत्र आल कि आम्ही आकाशाकडे डोळे लावून असतो.

काळ्या ढगांचे वर्णन

आम्ही शोधत असतो कि, कुठे दिसतोय का हा काळा विठोबा – म्हणजेच काळे ढग. त्या आधी आम्ही जमीन नांगरून ठेवायची आणि ढेकळ फोडायची. तसेच पावसाची वाट बघत बसायचो.

उन्हाळ्यात शेतीच काम करून अंग नुसत भाजून निघायचं. पण पाण्याचा काही पत्ताच नसायचा. महिला पिण्यासाठी पाणी भरपूर दूरवरून आणत असत.

पावसाचे आगमन

मग कधीतरी अचानक मळभ येते. आकाश काळेभोर दिसू लागते. सोसाट्याच वार सुटत आणि काही वेळाने पाण्याचे टपटप थेंब धरतीवर पडू लागतात.

पावसाळ्यात कधी – कधी गारा सुद्धा पडतात आणि गारांनी अंगण भरून जाते. संपूर्ण गाव आणि लहान – थोर माणसे पावसात न्हाऊन निघतात. तसेच पावसात भिजून आपला आनंद व्यक्त करतात.

शेतीची सुरुवात

पाऊस पडल्यावर शेतीच्या कामाला लागायाल हव आणि भिजलेल्या मातीत बी – बियाण पेराल पाहिजे. पाऊस असा पडला कि शेतीचे रोपे तरारून येतात. पण सर्व काही हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे.

त्यानंतर येईल ते पिक आणि मिळेल ते धान्य. यावरच आमच संपूर्ण जीवन अवलंबून आहे. पोळा झाला कि पावसाचे दिवस सरलेत. त्यामुळे आठ महिने आम्हाला दुसर कोणत पिक घेता येत नाही.

त्यामुळे आम्ही कमी पाण्यावरची नाचणी – वरीसारखी पिक घ्यावी लागतात. त्यामुळे आमच्या नशिबात कायमच दारिद्य असत. कायमची उपासमार करावी लागते.

Similar questions