bus stand Par Ek Divas essay in Marathi
Answers
Answer:
एकदा गावी निघालेल्या माझ्या आजोबांना निरोप देण्यासाठी मी माझ्या वडिलांबरोबर बसस्थानकावर गेले होते.रसत्यात आम्हाला प्रचंड ट्रैफिक मिळाली.बसस्थानकावर पोहोचल्यानंतर आम्हाला कळाले की आमची बस निघून गेली,आता दुसऱ्या दिवशी दूसरी बस येईल.
हे ऐकून आम्ही निराश झालो, वाटले की घरी जावे,पण बसस्थानक घरापासून खूप लांब असल्यामुळे आम्ही विचार केला की स्थानकावर थांबून दुसऱ्या बसची वाट पाहावी.
स्थानकावर खूप गर्दी होती.तिथे माणसे सतत येत जात होती.गाड्यांचे येणे,जाणे सुरु होते.गाडी आल्यावर लोक त्यात चढण्यासाठी धावत सुटायचे. तेव्हा लोकांची धक्काबुक्की व्हायची.तिथे फळांची,खाद्यपदार्थांची दुकाने होती.
बसस्थानकावरून देशात सगळीकडे गाड्या जात असल्यामुळे, तिथे वेगवेगळ्या प्रांतांचे,भाषा बोलणारे लोक दिसत होते.
हळूहळू अंधार होऊ लागला.इतक्या रात्रीसुद्धा तिथे लोकांची गर्दी होती.आम्ही जेवणासाठी जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. हॉटेलमध्येच आम्ही रात्र घालवली.सकाळी उठल्यावर,नाश्ता केल्यावर आम्ही पुन्हा बसस्थानकावर आलो.
सकाळी आमच्यसारखेच नातेवाईकांना सोडायला आलेले बरेच लोक तिथे होती.थोड्या वेळाने आजोबांची गाडी आली.आम्ही त्यांना निरोप दिला आणि तिथून निघून आलो.
अशाप्रकारे, बसस्थानकावर घालवलेला हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय बनला.
Explanation: