Hindi, asked by santoshktiwari6, 2 months ago

चित्र या शब्दाचे लिंग ओळखा

Answers

Answered by mrAdorableboy
3

नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी

पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.

स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.

नपुंसकलिंगी : पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.

Answered by sorrySoSORRY
4

Answer:

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी

पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.

स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.

नपुंसकलिंगी : पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल

नियम : 1

‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते.

मुलगा – मुलगी – मूलगे

पोरगा – पोरगी – पोरगे

कुत्रा – कुत्री – कुत्रे

नियम : 2

काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.

सुतार – सुतरीन

माळी – माळीन

तेली – तेलीन

वाघ – वाघीन

नियम : 3

काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात.

हंस – हंसी

वानर – वानरी

बेडूक – बेडकी

तरुण – तरुणी

Similar questions