चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. (सकारण स्पष्ट करा)
Answers
warali sakkhya jamatini hi parampara japali ahe.
apalya pramanech pudcha pidhila tyacha aswad gheta Yavach mhanun........
चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. (सकारण स्पष्ट करा)
उत्तर :- चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, कारण
१) चित्रकथी परंपरा म्हणजे कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा होय.
२) कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातील ठाकर आदिवासींनी हि परंपरा जतन केली आहे.
३) चित्रकथी परंपरेत कागदावर चित्र काढून ती नैसर्गिक रंगात रंगविली जातात.
४) ठाकर, आदिवासी, वारली अश्या जमातींनी चित्रकथी परंपरा टिकवून ठेऊन त्यांचे जतन करून ठेवले आहे, परंतु त्यांनी सांभाळून ठेवलेल्या पोथ्या जीर्ण झाल्या आहेत.
५) नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
६) कारण या परंपरा आपल्या संस्कृतीचा एक घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे.