Art, asked by likefreefire1, 3 months ago

१) चित्रपटांचे प्रकार स्पष्ट करा. BA/bcom​

Answers

Answered by like19
10

(अ) कथात्मक-नाट्यमय रचना (Narrative Dramatic Structure)

चित्रपटाच्या क्षेत्रात या प्रकारच्या रचना बहुसंख्येने आहेत. कथावस्तूतील पात्रे, त्यांच्या जीवनातील प्रसंग, संघर्ष, उत्कर्षबिंदू आणि उकल अशा प्रकारे समग्र रचना केलेली असते. ही समग्र रचना अन्य कलाप्रकारांमध्येही दिसून येत असते. या रचनेत कथनाचा ओघ, भावनिक आंदोलन, गतिमानता आणि सुसंगती ही मुख्य वैशिष्ट्ये असतात.

(आ) भाष्यासहित घटनांची महाकाव्यसदृश रचना (Epic Structure) )

या प्रकारात संपूर्ण चित्रपटाची बांधणी भाष्यदृश्यांमध सूत्रांनी होते आणि एकेका विवरणासाठी आख्यानासारख्या प्रसंगमालिका येतात, पुन्हा भाष्याचे सूत्र पुढे जाते आणि पुन्हा दुसरे, पुढचे आख्यान आणि शेवटी या विविध धाग्यांना एकत्रित आणणारा

निष्कर्ष दृश्याचा भाग येतो. अकिरा कुरोसावा यांच्या राशोमान या श्रेष्ठ कलाकृतीची समग्र रचना या प्रकारची आहे.

(इ) गीतसदृश रचना (Lyrical Structure)

या प्रकारातील क्रम हा काव्यातील प्रतिमांप्रमाणे भावसंगतीने नियंत्रित होतो. एक कडवे संपल्यावर ध्रुवपद येते तेव्हा त्यात नव्या अर्थछटेची अभिव्यक्ती होते. त्याप्रमाणे चित्रपटाचे खंड एकेका कडव्याप्रमाणे आशयांची अभिव्यक्ती साधत जातात. बर्ट हान्स्ट्रा या डच दिग्दर्शकाचा 'ग्लास' हा लघुपट या प्रकारचे उत्तम उदाहरण आहे.

एखाद्या शॉटलाही काही वेळा काव्याचा शॉट म्हणून उल्लेखिले जाते. पण त्या वेळी बहुधा काव्यात्मता हे दृश्य पोताचे वैशिष्ट्य असते. गीतसदृश रचनेमध्ये दृश्य पोत काव्यात्म असेलच असे काही नाही.

Similar questions