१९६० च्या दशकात _____ चळवळीला सुरूवात झाली
Answers
Answer:
विभागाचा इतिहास
सहकार म्हणजे सारख्या विचाराचे लोक एकत्र येऊन एखादी आर्थिक उलाढाल करणारी संस्था. यात एक व्यक्ती एक मत या प्रणालीचा वापर होतो. अगदी सुरुवातीला इंग्लंडमध्ये सहकारी तत्वावर असणारी शेतकऱ्यांची संस्था होती. भारतात सर्वप्रथम सहकार चळवळीची सुरुवात १९०४ च्या सहकारी संस्थांचा कायद्यानुसार झाली. हा कायदा सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी करण्यात आला होता तथापि, उद्दिष्ट मर्यादित होते. या कायद्यातील तरतूदी अधिक व्यापक क्षेत्राला लागू करण्यासाठी त्यानंतर १९१२ चा सहकारी संस्थांचा कायदा करण्यात आला. त्या कायद्यानुसार सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी उपलब्ध झाली व या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी व प्रशासनाच्या कामकाजासाठी निबंधकाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यामधूनच सहकार विभागाची स्थापना झाली. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सहकार हा विषय प्रांतिक सरकारांकडे सोपविण्याचा निर्णय झाल्यानंतर संबंधित प्रांतिक सरकारांनी आपापले कायदे करुन घेण्यास सुरुवात केली. मुंबई प्रांतासाठी १९२५ चा सहकारी कायदा करण्यात आला. सन १९४७ मध्ये बॉम्बे ॲग्रीकल्चरल प्रोड्युस मार्केट रेग्युलेशन ॲक्ट (१९३९) व बॉम्बे मनी लेंडर ॲक्ट (१९४६) हे कायदे निबंधकाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले.