चहापाणी-चहा आणि पाणी- समासाचा प्रकार ओळखा. द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष 1p
Answers
Answer:
Explanation:
समास-
शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात.
सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द(पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात.
असा जोडशब्द बनवताना पदांतील परस्पर संबंध दाखविताना काही प्रत्यय गाळले जातात व शब्द अधिक सोपा केला जातो.
Important Points
द्वन्द्व समास- ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात, त्यास द्वन्द्व समास असे म्हणतात.
द्वन्द्व समासाचे ३ प्रकार आहेत-
इतरेतर द्वन्द्व समास
वैकल्पिक द्वन्द्व समास
समाहार द्वन्द्व समास
इतरेतर द्वंद्व समास- ज्या समासाचा विग्रह करतांना 'आणि, व' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.
उदा-
आईबाप- आई आणि बाप
स्त्रीपुरुष- स्त्री आणि पुरुष
अशाचप्रकारे ‘बहीणभाऊ’ या शब्दाचा समास विग्रह 'बहीण आणि भाऊ' असा होईल व हा इतरेतर द्वंद्व समास होईल.