English, asked by Varadnb553, 9 months ago

Chandrayan and Mangalyan information in Marathi

Answers

Answered by spinner1
1

Answer:

chandrayan

चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.[१][२] १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

mangalyan

मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.[१][२][३] यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. [४]

मंगळाभोवती कक्षा

संपादन करा

मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल

Answered by Maharaj44
0

Answer:

sorry dear I can't speak,write and understand Marathi. helpless

Similar questions