Changing world challenges and benefits essay in Marathi
Answers
बदलते जग
बदल हा विश्वाचा नियम आहे. जगासोबत बदलणे हे आपले काम आहे. ज्या गतीने जग चालते, त्या गतीने आपण चालणे भाग आहे. नाहीतर आपण मगे राहून जाऊ. ह्या बदलत्या जगात अनेक अडचणी आढळून येतात. तसेच बदलण्याचे फायदे सुद्धा आहे.
बदल घडावताना येणाऱ्या अडचणी पुढील प्रमाणे आहेत.
१. बदल घडावताना खूप लोक त्याचा विरोध करतील. पण जर तुम्हाला विश्वास आहे की हा बदल झाला तर लोकांचं भलं होईल, तर प्रेयत्न करत राहा, थांबू नका.
२. बदल घडावताना समाज त्याचा प्रतिकार करेल. कारण बदल स्वीकारण्यासाठी मन आणि विचार सरणी मोठी लागते.
३. बदल घडायला वेळ लागतो. जर तुम्हाला वाटत असेल की आज मी विचार केला आणि उद्या समाजात बदल घडेल तर हा निव्वळ गैरसमज आहे. बदल व्हायला अनेक वर्षांचा कालावधी लागतो.
बदल घडावण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहे.
१. बदल घडल्यामुळे समाजाची प्रगती होते.
२. लोक नवीन विचार करायला लागतात आणि नवीन जीवन स्वीकारतात.
३. बदल घडल्यामुळे लोक जुने विचार अंधळ्याप्रमाणे न पळत, त्यांना नवीन आणि रूप देतात.