India Languages, asked by Laly3865, 1 year ago

Chasma nasta tar essay in Marathi

Answers

Answered by Hansika4871
2

आताच्या वेगाने धावत असलेल्या मुंबई शहरामध्ये नोकरी करणाऱ्या तरुण/तरुणींची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक ऑफीस मधे संगणक अथवा कॉम्प्युटर शिवाय कामे होतच नाहीत. संगणक आताच्या काळाची गरज झाला आहे. तसेच हल्ली प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल फोन हा असतोच.

ह्या आधुनिक उपकरणांशी सांगड घालताना माणसाची जीवन शैली बदलली आहे आणि आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत.

डोळ्यांचे वेगवेगळे आजार, लांबच कमी दिसणे इत्यादी वाढत चालले आहे. आणि जर ह्या परिस्थितीत चष्मा नसेल तर बापरे ही कल्पना खूपच भयानक आहे. लोकांचे डोळे दुखतील, रोजची संगणकाची कामे अधुरी राहतील, ऑफीस मधली कामे अपूर्ण राहतील. ज्या लोकांना पुस्तक वाचायला आवडतं त्यांना ते वाचायला सुद्धा त्रास होईल. तसेच वृध्द माणसांना आपले नेहमीचे काम करणे देखील खूप कठीण होऊन जाईल.

Similar questions