christmas essays in marathi
Answers
Answered by
12
नाताळ नाताळं हा ख्रिश्चन बांधवांचा सन आहे . २५ डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ; म्हणून हा दिवस ख्रिश्चन बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात . या दिवसाला `क्रिसमस ` असेही म्हणतात . नाताळच्या दिवशी ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात . नवे कपडे घालतात . घरातल्या एका कोपऱ्यात नाताळवृक्ष उभा करतात . ते हा वृक्षही छान सजवतात . दारावर किंव्हा चौकात कागदी चांदण्या लावतात . चांदण्यावर शुभेच्छा लिहितात . नाताळच्या दिवशी चर्चही सजवतात . सर्व ख्रिश्चन बांधव २४ डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जमतात . प्रार्थना करतात . नाताळाची गाणी गातात . सगळे जन एकत्र नृत्य करतात . एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात . लोक आपल्या घरी पक्वान्ने तयार करतात . विविध प्रकारचे केक करतात . नाताळच्या दिवशी नाताळबाबा लहान मुलांना खाऊ वाटतो . नाताळबाबा मुलांना खूप आवडतो . अशा तऱ्हेने अत्यंत उत्साहांत नाताळ सण साजरा होतो .
Answered by
2
नाताळ हा सण डिसेंबर मध्ये येतो. ख्रिसमस हा प्रामुख्याने ख्रिश्चन बांधवांचा सण आहे. येशु ख्रिस्तांचा जन्म दिवस हा नाताळ म्हणुन साजरा केला जातो. दरवर्षी हा सण २५ डिसेंबर ला जगभरात साजरा करतात. या दिवशी सगळे ख्रिश्चन बांधव घरांची सजावट करतात, रंगरंगोटी करतात. घरात नवीन नवीन चविष्ट पदार्थ बनवतात. घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री उभारतात. ख्रिसमस ट्री ला सुंदर सजवतात. ख्रिसमस ट्री म्हणजे सुचीपर्णी वृक्षापासुन बनवली असते. या दिवशी मध्यरात्री सांताक्लाज(नाताळ्बाबा) येऊन लहान मुलांना भेट वस्तु देतो .त्याचे वर्णन असे की लठ्ठ , लाल रंगाचा पोषाख , लांब पांढरी दाढी,लाल टोपी , एक मोठी झोळी ,चष्मा असतो.
Similar questions