composition on my favourite game in marathi
Answers
Answer:
Hope it will help you
Explanation:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये लोकांचे क्रिकेटवर असलेले अपार प्रेम व्यक्त केले आहे. क्रिकेट या खेळाचे फायदे , सविस्तर रित्या सांगीतले आहेत . वर्णन केेले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्त्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायाम, योग वा खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे. मी त्यांपैकीच एक मी क्रिकेट खेळतो, क्रिकेटसंबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन मी मोठ्या हौसेने क्रिकेट खेळतो, पंरतु मैदानावर जाणे न जमल्यास T.V. किंंवा मोबाईलवर क्रिकेटचे सामने पाहतो.
असे सामने पाहताना सर्व क्रिकेटप्रेमी देहभान हरपून जातात. क्रिकेटवर अलीकडे खूप टीका होत आहे. ती रास्तच आहे. हा खेळ चार-चार, पाच-पाच दिवस चालतो. क्रिकेटचे सामने असले की लोकांमध्ये अक्षरशः वारे संचारते. लोक कामधाम सोडून हा खेळ पाहत बसतात. त्यामुळे देशभर कामाचे लक्षावधी तास फुकट जातात. कामावर हजर असलेले लोक एकाग्र चित्ताने कामे करीत नाहीत. विदयार्थ्यांचे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. देशाच्या कार्यशक्तीची ही फार मोठी हानी आहे, यात शंकाच नाही.